अजिज खान
शहर प्रतिनिधी ढाणकी
नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून, यात युवक मंडळ पुसद द्वारा संचलित असलेल्या स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयाचा निकाल हा ८५ टक्के लागला आहे. यामध्ये ओम दिपक उपेवाड ४४५ गुणासह ८९ टक्के घेऊन उत्तीर्ण झाला तर, सुरज संजय सुरमवाड ४३८ गुणांसह ८७.६० % आणि आनंदसागर रमेश मोटाळे ४३७ गुणांसह ८७.४० % घेऊन उत्तीर्ण झाले. यांसह शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे युवक मंडळ पुसदचे अध्यक्ष के.डी. जाधव, सचिव विजय जाधव, कोषाध्यक्ष डॉक्टर संजय जाधव, उपाध्यक्ष डॉक्टर करण जाधव, सदस्य देव जाधव तसेच संचालक मंडळाच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी व शाळेचे मुख्याध्यापक आर. एच. जयस्वाल, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


