सय्यद मुहाफीज
शहर प्रतिनिधी अहमदनगर.
अहमदनगर मधील फकीरवाडा रोड परिसरात रविवारी दिनांक 4,रात्री दमबारा हजारी दर्गाजवळ निघालेल्या संदर्भ मिरवणुकीमध्ये मुघल सम्राट औरंगजेब यांची प्रतिमा असलेले फलक जळगावण्याचा प्रकार घडला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला असून याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नियुकीस आलेले पोलीस कर्मचारी सचिन नवनाथ धोंडे यांनी फर्याद दिली आहे.
यामध्ये म्हटले आहे की फकीरवाडा परिसरात रविवारी दिनांक 4 रात्री 9.10 वाजण्याच्या सुमारास दम बाराहजारी दर्गा जवळ निघालेल्या संदल उर्स मिरवणुकीमध्ये यातील आरोपी यांनी संगणमताने मुघल सम्राट औरंगजेब यांची प्रतिमा असलेल्या पलक हातामध्ये घेऊन प्रदर्शन करून बाप तो बाप होता है बेटा तो बेटा होता है अशा घोषणा देऊन दोन समाजात जातीय तीळ निर्माण करून द्वेष पसरेल असे कृत्यकेले आहे
या फर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मोहम्मद सरफराज इब्राहिम सय्यद उर्फ सरफराज जहागीरदार राहणार (दर्गादायरा), अफनान आदिल शेख उर्फ खडा (राहणार वाबळे कॉलनी), शेख सर्वर राहणार (झेंडीगेट), जावेद उर्फ गब्बर राहणार (आशा टॉकीज चौक) यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम 505 (2), 298, 234 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


