कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद तालुक्यातील मांडवा येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक ६ जून २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय मांडवा येथे कोर्टेवा अग्रीसायन्स या कंपनीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच अल्का ढोले उपसरपंच विजय राठोड पोलीस पाटील दत्तराव पुलाते तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर चव्हाण सोसायटी अध्यक्ष वसंता आडे विठ्ठल घुक्से महादेव डोळस चैतन्य जनलगोड्डा डॉ. संदिप चव्हाण श्रध्दा जोशी कृषीमित्र विश्वनाथ मुखरे ग्राम परिर्वतन समिती अध्यक्ष बजरंग पुलाते उपाध्यक्ष समाधान आबाळे तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी वृक्षप्रेमी कैलास राठोड यांचा चैतन्य जनलगोड्डा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ शाल वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात व शांतीधाम येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आंबा पेरू सिताफळ बटमोगरा काँनोकोफोरस चाफा अशा विविध प्रजातीच्या १७ रोपट्यांचे रोपण करण्यात आले
यावेळी श्रध्दा जोशी यांनी फवारणी औषधी व पर्यावरणाबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक ,ग्राम परिवर्तन समितीचे पदाधिकारी मंडळी शेतकरी बांधव महिला बचत गटाच्या महिला ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिक धाड यांनी केले तर आभार अक्षय जगताप यांनी मानले.


