भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव :- आज शनिवार दिनांक 3/6/ 2023 रोजी श्रीराम विद्यालय, ढोरजळगाव येथे एस. एस. सी.व एच. एस. सी. बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षपदावरून मा. प्राचार्य बोलत होते.स्वप्न मोठे ठेवा, प्रामाणिकपणा व सचोटीने काम करा, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामाजिक ज्ञान असणे गरजेचे आहे, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी इयत्ता बारावी कला व विज्ञान शाखेतील प्रथम तीन क्रमांक पटकावलेले विद्यार्थी व त्यांचे पालक, तसेच इयत्ता दहावी मधील सेमी व मराठी माध्यमातून प्रथम तीन क्रमांक पटकावलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सत्कार करण्यात आला. इ.10वी मध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचाही सत्कार करण्यात आला.यावेळीश्री.महादेवजी पाटेकर यांनी आपल्या भाषणात ध्येय निश्चित असेल तर यश मिळते असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. तर श्री. संजयजी बुधवंत यांनी इच्छा असेल तर गुणवत्तेला परिस्थिती आडवी येत नाही, श्री.संभाजी लांडे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकाची मस्तकाशी मैत्री करावी असा मोलाचा उपदेश केला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री कांतेश्वर ढोले , पर्यवेक्षक श्री सुनील आव्हाड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह ढोरजळगाव ने.चे माजी सरपंच अनंता उकिर्डे, भीवसेनजी केदार, विद्यालयाचे माजी प्राचार्य विक्रमराव उकिर्डे , पत्रकार दीपकजी खोसे, देविदास गिर्हे, आसाराम शेळके, निलेश वामन, बाळासाहेब शेळके, बाळासाहेब पाटेकर, कैलास देशमुख, रज्जाकभाई शेख, पांडुरंग गरड, विष्णुपंत गरड, पांडुरंग सांगळे, रवींद्र कणके, बाळासाहेब कराड, संभाजी फसले ,देविदास देशमुख, गणेश पाटेकर ,शहादेव वाकडे, संजय बकाल, जयदीप लबडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल भालसिंग यांनी केले व श्री सुरेश भापकर यांनी आभार मानले…


