शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल शाळेचा शंभर टक्के निकाल व यशवंत माध्यमिक शाळेचा 90.19% टक्के निकाल लागला आहे,. सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे .यामध्ये तालुक्या मधून द्वितीय तर शाळेतून प्रथम क्रमांक ऋतुजा प्रविण कुंभकर्ण 97.20 % द्वितीय क्रमांक आदेश बापुराव कदम 96.60% तृतीय क्रमांक अंकिता गोविंद तुडमे 95.80 % व प्रतीक रामप्रसाद घोडके 95.80%अनुक्रमे आलेले आहेत 38 पैकी 16विद्यार्थ्यांना 90% टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. यशवंत माध्यमिक शाळेचा निकाल 90.19% टक्के निकाल लागला आहे.या मध्ये नकुल रामेश्वर उफाड 94%
श्रुती भागवत वायगुंडे 93%
वैष्णवी विठ्ठल जोगदंड 92%
दुर्गा बाळासाहेब आव्हाड 91%
असा घवघवीत निकाल लागला आहे.
या यशाबद्दल यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष माननीय मुकेश राव हरिभाऊकाका बोराडे, माजी नगराध्यक्ष मा.विनोद रावजी हरिभाऊ काका बोराडे तसेच यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक साईराज मुकेशराव बोराडे शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक व शिकक्षेतर कर्मचारी आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.