सुरेश म्हेत्रे
ग्रामीण प्रतिनिधी श्रीगोंदा
शेडगाव येथील नुतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० वी तील विद्यार्थ्यांनी या ही वर्षी उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

या वर्षी १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल हा ९८.२७% इतका लागला असुन यामध्ये प्रथम क्रमांक भुजबळ प्रथमेश राजेंद्र ८९.४०% . द्वितीय क्रमांक शेंडे निशा राजेंद्र ८९.२०% . तृतीय क्रमांक कोळपे रिंकू सखाराम ८८.२०% या विद्यार्थ्यांनी प्रथम,द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकावले असुण , या परीक्षेसाठी एकुण ५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी ५७ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयाचा एकुण निकाल हा ९८.२७% इतका असूण यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल संस्था अध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी सर्वांचे अभिनंदन केले.


