अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचा वर्ग १० वीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून यामध्ये वसंतराव नाईक विद्यालय पातुरचा १०० टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयाने आपली चालत आलेली निकालाची परंपरा या वर्षी सुद्धा कायम राखली आहे.वसंतराव नाईक विद्यालयामध्ये यावर्षी एकूण ३४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते,त्यामधून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या विद्यालयातून भावेश गवई याने ८६.२० % गुण मिळवून विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला ,तसेच श्रीराम फुलारी याने ८५.४० % गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला, पियुष बगाडे याने ८५.२० % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. कु. वैशाली इंगळे ८४.०० % , अभिषेक शिंदे ८३.८०% आदी विद्यार्थ्यांसह विद्यालयातून एकूण १४ विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झाले तर १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले व ०५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.विद्यालयातील या विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक /सचिव मा. रामसिंग जाधव तसेच मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.


