बंकटी हजारे
तालुका प्रतिनिधी माजलगाव
राजेगांव:- माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात सर्वप्रथम आर्या कैलास तौर ८७.६०% द्वितीय संजना दिपक साळवे ८६.४०% तृतीय तांगडे वैष्णवी धनंजय ८५.२०% तर चतुर्थ गरड महेश नारायण ८४.२०%, व कचरे सार्थक बापु ८४.२० टक्क्याने पास होऊन शाळेचा निकाल शंभर टक्के लावला आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष मा. राधाकृष्ण (आण्णा) होके पाटील, संस्थेचे सचिव अशोकराव होके पाटील, तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी दिल्या.