सुरेश म्हेत्रे
ग्रामीण प्रतिनिधी श्रीगोंदा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या श्रीगोंदा आगार मधुन धावणारी श्रीगोंदा राशीन ही बस श्रीगोंदा आढळगाव हिरडगाव फाटा चांडगाव टाकळी शेडगाव जलालपुर मार्गे राशीन अशी धावते परंतु चांडगाव ते शेडगाव या रस्त्याचे दुरुस्तीचे काम चालु असल्याने बससेवा ही दिनांक २९-०५-२०२३ पासुन तात्पुरती बंद करणेत आली आहे, रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर श्रीगोंदा ते राशीन या मार्गावरील बससेवा पूर्वरत करणेत येईल. याच बसमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात त्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होऊ नये अशी विद्यार्थ्यांनी खंत व्यक्त केली.











