शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाल आज शुक्रवारी (दि.2) दुपारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. परभणी जिल्ह्यातील एकण 27 हजार 558 विद्यार्थ्यांपैकी 27 हजार 208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 24 हजार 611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून याची टक्केवारी 90.45 इतकी आहे.
जिल्ह्यातील 7 हजार 496 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 8 हजार 601 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 6 हजार 586 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
14 हजार 820 मुलांनी परीक्षा दिली होती, यातील 12 हजार 996 मुले उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 12 हजार 388 मुलींनी परिक्षा दिली होती, यातील 11 हजार 615 मुली दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.


