कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा येथील सौ.रजनीताई देशमुख व सौ.अलकाताई वरणकार या दोन्ही नारीशक्तीचा सोनाळा येथील सरपंच हर्षल खंडेलवाल तसेच उपसरपंच रईसाबी शेख रशीद यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,प्रशस्तीपत्र,स्मृतिचिन्ह व ५०० रुपयाचा धनादेश देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शासन तर्फे सामाजिक क्षेत्रात योगदान दिलेल्या सर्व महिलांचे बालविकास विभाग व ग्रामपंचायत स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त गौरविण्यात येत आहे.