बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड : पुंण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त खानवटे ता.दौंड येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर तरूण मंडळ आयोजित किर्तनाचे कार्यक्रमांत त्या बोलत होत्या खर्याच खोट आणि लबाडाच तोंड मोठ अशी अवस्था झाली आहे. परंतु सत्य हे शेवटपर्यंत कधीच साथ सोडत नाही. असे त्या म्हणाल्या. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये सकाळी 9 वाजता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते आणि खानवटे गावच्या मा सरपंच जयाताई खुटाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अल्प उपहाराचा आस्वाद सर्वांनी घेतला नंतर शिवशंभो रक्त पेढी सोलापूर यांचे मार्फत आई सेवा संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी धायगुडे यांनी केले होते. यावेळी शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच मच्छिंद्र पोटफोडे यांनी केले याठिकाणी 9 ते 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिरात 51 जनांनी रक्तदान केले. सायंकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत समाज प्रबोधनकार ह. भ. प. जयश्रीताई महाराज तिकांडे संगमनेर माझा ज्ञानोबा सिरीयल फेम मायबोली चॅनल नवी दिल्ली राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या यांचे सुश्राव्य किर्तन झाले.त्यावेळी बोलत होत्या मणुष्य जन्म परत परत नसतो सर्वांशी ऐकमेकांनी चांगले वागा असे सांगितले. याठिकाणी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आबासाहेब देवकाते, मदनवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजाभाऊ देवकाते, खानवटे गावच्या माजी सरपंच जयाताई खुटाळे,माजी सरपंच अर्जूनराव शिरसट, माजी ग्रामपंचायत सदस्य नंदिनी चांदगुडे,महेश शिंगटे, ग्रामपंचायत सदस्य अंजली ढवळे, माजी उपसरपंच हनुमंत पवार, विलास पवार, रंगनाथ ढवळे, महेश राजे भोसले,शंकर गवळी, शरदराव ढवळे, राहुल शेळके, उदनराजे भोसले, भिमराव पवार, अमोल जगदाळे,विशाल भोसले, वैभव लोखंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


