विश्वास काळे ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
स्व. देवराव पाटील यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय धानोरा येथे करण्यात आला या मध्ये सानिका संतोष कान काटे गायत्री दिगंबर कदम श्रुती अवधूत हामंद आरती भगवान काळे या विद्यार्थिनीचा सत्कार धानोरा गावचे माजी उप सरपंच प्रकाश काळे यांच्या हस्ते पार पडला. स्व देवराव पाटील यांनी आपल्या राजकीय जीवनात विविध पद भूषवली होती जिल्हा मध्यवरती बँक कृषी उत्पंन बाजार समिती सभापती धानोरा गावचे ते 25 वर्ष सरपंच सुद्धा राहिले त्यांनी आपल्या जीवनात विविध प्रकारच्या लोकांना मदत केली.त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी आपल्या राजकीय जीवनात काम केले असे प्रतिपादन ड्रॉ प्र भा काळे यांनी सांगितले देवराव पाटील यांना तालुक्यामध्ये लोकनेते म्हणून लोक ओळखत होते राजकारणा बरोबर ते एक उत्तम शेतकरी सुद्धा होते येणाऱ्या काळामध्ये त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम त्यांचे नातू आदित्य पाटील हे चांगल्या पद्धतीने समाज सेवा करून जोपासत आहेत धानोरा गावाला तालुक्यामध्ये देवराव पाटील यांच्या नावाने सुद्धा ओळख मिळाली आहे.


