गोविंद खरात
शहर प्रतिनिधी अंबड
अंबड : महाराष्ट्र शासनाकडून राबिवण्यात येणाऱ्या शासकिय योजनांची जत्रा या शिबिराचे आयोजन डॉ विजय राठोड, जिल्हाधिकरी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली व अंबड उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव , अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड तालुक्यातील वसंतनगर येथे राबविण्यात आला. त्या ठिकाणी विद्येची देवता सरस्वती देवीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अशा 50 प्रमाणपत्रांचे वाटप अर्जदारांना करण्यात आले. या वेळी अंबडच्या महसूल नायब तहसीलदार धनश्री भालचीम , परिविक्षाधीन तहसीलदार ऋतुजा पाटिल , निवडणूक नायब तहसीलदार मिलिंद शिनगारे , अंबडचे अव्वल कारकून रवि कांबळे , व्यंकट मोरे, सेतू लिपिक संतोष गायकवाड , प्रवीण पवार लिपिक, सेतू चालक राम नागरे, गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते. त्या ठिकाणी अंबड तहसील अंतर्गत शासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व योजनेचे प्रमाणपत्र , त्यासाठी लागणारी कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सेतु द्वारे देण्यात येणारे विविध प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.