अरविंद जाधव
ग्रामीण प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : शिवसेना युवासेना घाटंजी तालुका व रयत बहुउद्देशीय संस्था, महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घोटी येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,युवासेना जिल्हाप्रमुख आकाश राठोड आयोजित मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनात, नेत्र तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते.सदर शिबिरामध्ये 450 रुग्णांची तपासणी करण्यात आली होती, त्यापैकी 150 रुग्ण मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी ठरविण्यात आले होते त्यानुसार आज घाटंजी तालुक्यातील 42 रुग्णांना नागपूर येथील प्रसिद्ध महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय येथे पाठविण्यात आले, शिबिरातील रुग्णांना नागपूर येथे नेवुन यशस्वी आयोजनासाठी महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय येथील तज्ञ डॉक्टर,कर्मचारी व शिवसेना तालुकाप्रमुख निलेश चव्हाण, युवासेना तालुकाप्रमुख अजित ठाकरे, युवासेना पदाधिकारी महेंद्र राठोड, गणेश राठोड, विनोद राठोड, पवन अळसपुरे यांनी परिश्रम घेतले.











