अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : २५/०५/२०२३ माध्यमीक उच्च माध्यामिक शालांत परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने घोषीत करण्यात आला आहे. यामध्ये तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. एकूण निकाल- 96.92 % लागला असून परीक्षेकरीता प्रविष्ट झालेल्या एकूण 261 विद्यार्थ्यांपैकी प्राविण्य श्रेणी प्राप्त विद्यार्थी- 53 तर प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी- 118 पास झाले आहेत. व्होकेशनल अभ्यास क्रमांपैकी हॉर्टीकल्चर मधे प्रथम विवेक बबन वाघमारे ( 63 . 83 ) समिक्षा काकड (62 .50 ) द्वितीय तर कार्तिक खरडे ( 61 . 17 ) टक्के गुण घेऊन तृतीय आले आहे आहेत. इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी मध्ये धीरज विलास गवळी हा प्रथम असून फूड टेक्नॉलॉजी मधून गौरी संतोष काळपांडे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.शाळेच्या विज्ञान शाखा निकाल- 100 % लागला आहे. प्रविष्ट -159 विद्यार्थ्यांपैकी प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी- 89 पास झाले आहेत.विज्ञान शाखेतून विधी विनोद केळझरकर 87.50 टक्के गुण घेऊन प्रथम अक्षया सुधाकर कवर 86.83 टक्के गुण घेऊन द्वितीय तर पूजा रमेश बावस्कर आणि वेदांती दीपक ढगेकर 86 टक्के गुण घेऊन तृतीय आल्या आहेत.कला शाखेच निकाल- 89% लागला आहे.परीक्षेला बसलेल्या एकूण – 74 विद्यार्थ्यांपैकी प्राविण्य श्रेणीत – 4 प्रथम श्रेणीत 18 कला शाखेमधून स्वप्निल गजानन करवते प्रथम (९०.३३ ) गुण घेऊन प्रथम तर 86. 33 टक्के गुण घेऊन श्रेया विनोद गवळी द्वितीय दिव्यानी महादेव वैद्य 77 गुण घेऊन तृतीय आली आहे.वाणिज्य शाखा निकाल- 100% लागला असून
परीक्षेला प्रविष्ट एकूण 28 पैकी प्राविण्य श्रेणी प्राप्त विद्यार्थी- 1 प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी-11 विद्यार्थी पास झाले आहेत. यामधे तन्वी प्रदीप कुटाफळे 77.50 टक्के गुण घेऊन प्रथम ओम समाधान ठाकरे 74. 60 टक्के गुण घेऊन द्वितीय तर साक्षी समाधान ठाकरे ही 71 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विरार एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक ,माजी प्राचार्य विजयसिंह गाहीलोत सचिव स्नेहप्रभादेवी गहिलोत मॅडम , संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अंशुमानसिंह गहिलोत उपप्राचार्य सुनील चव्हाण उपमुख्याध्यापिका रश्मी धेंगे पर्यवेक्षिका एम.बी परमाळे, जगमोहनसिंह गहिलोत, विपिनसिंग गहिलोत ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.


