पवन मनवर
तालुका प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : आर्णी तालुक्यातील पहूर नस्करी या गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी थेट ग्रामसभेत सरपांच्यावर अविश्वास ठराव मांडला असून दि.२/५/२०२३ रोजी तहसील कार्यालय आर्णी याच्या सेवेशी निवेदन सादर केले. महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच व उपसपंच अविश्वास ठराव अधिनियम १९५८ चे कलम ३५ नुसार सरपंच्यावर अविश्वास ठराव मांडता येते. पहूर न.चे
सरपंच श्री.अतुल अजाबराव देठे यांच्या विरुद्ध ग्रामपंचायती च्या सभेत ठराव मांडण्यात आला असून ग्रामपंचायत सदस्य श्री.अतुल रमेश पूनसे,श्री.गजानन दादाराव आग्रे,महादेव शालिक कोडापे,सौ.साधना अनिल धांदे,सौ. माला मारोती मेश्राम, सौ.छबुबाई पांडुरंग सोंगाडे,सौ.रुपाली गणेश टेकाम,असे एकूण सात सदस्यांनी अविश्वासाचे कारण सांगत निवेदनात मांडले श्री. अतुल अजाबराव देठे हे ग्रामपंचायतीच्या सभासदांना विश्वासात घेऊन काम करत नाही,सरपंचाचे विकास कामात लक्ष नाही,विकास कामे करण्यात अडथळे आणतात, प्रतक्ष मासिक सभा घेत नाहीत, स्वतःच्या मना प्रमाणे रेकॉर्ड तयार करतात. हे सर्व कारण करिता आम्ही सरपंच यांच्या विरुद्ध हा अविश्वास ठराव मांडला असे आर्णी तहसील कार्यालय यांच्या समोर निवेदनाद्वारे देण्यात आले.त्यानुसार श्री.अतुल अजाब राव देठे सरपंच यांना तहसील कार्यालय आर्णी यांच्या मार्फत विशेष सभा घेण्या करिता नोटीस देण्यात आली असून सदर नोटीस मध्ये दि.८/५/२०२३ रोजी दु.२ वाजता ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहावे असे सांगण्यात आले.


