शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : ०१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मुंबई मधील जनतेची अहोरात्र सेवा बजवणाऱ्या कर्मचारी वर्गाचा मान सन्मान कार्यक्रम मा. कार्यसम्राट आमदार श्री कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले, स्व प्रमोद महाजन कला पार्क, सेनापती बापट मार्ग, दादर, मुंबई येथे झाले तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ येथे हुतात्मा बाबू गेनू यांना श्री संदीप तिवरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला व पुष्पाजली वाहिली. त्यानंतर विभागात श्री. सत्यनारायण महापूजेला विनंतीचा मान स्वीकारून, बाल गोविंददास सोसायटी टायकलवाडी माहीम, मीरांडा अपार्टमेंट कीर्ती कॉलेज दादर श्री.शिवाई क्रीडा मंडळ नायगाव. येथे उपस्थित राहून दर्शन घेतले. या कार्यक्रमाला उपस्थित श्री अनंत (दादा) शिर्सेकर, श्री दादा कांबळे, श्री संदीप तिवरेकर, श्री राजू (भाई) सावला, सौ हर्षल कांबळे,श्री सुरेश दुबे, श्री जितू गुप्ता, श्री संतोष शिंदे, श्री प्रवीण गुरुव, श्री नागेश आचार्य, श्री रवी गनापूरा, श्री सूर्या बिल्ला,श्री अरुण कदम, श्री आदर्श दुबे, श्री यश विलनकर, श्री राजेश धस, श्री दिनेश झिमूर, श्री संतोष राठोड, श्री ओमकार पाटील, श्री भागेश मांडवकर, श्री ओमकार गुरव, श्री नयन कांबळे, श्री. विनोद नाईक सोबत श्री. जितेंद्र कांबळे उपस्थित होते.