अशोक गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी : महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन महावितरणाच्या अमरावती परिमंडळात उत्साहात साजरा करण्यात आला मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ ज्ञानेश कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर परिमंडळातील गुणवंत कामगार पुरस्कारने सन्मान सन्मानित करण्यात आले. प्रधान तंत्रज्ञ गजानन राचटकर व यंत्रचालक शेख मन्नन साहेब विद्युत भवन व प्रादेशिक केंद्र येथे महावितरण चा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी प्रमुख पाहुणे अधीक्षक अभियंता माननीय देवहाते साहेब औद्योगिक संबंध अधिकारी कार्यकारी अभियंता मधुसूदन मराठे साहेब अधिकारी अभियंता भारत भूषण व प्रणाली विश्लेषक आलेगावकर साहेब कार्यकारी अभियंता भारत भूषण बिगड प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी बोलताना ज्ञानेश कुलकर्णी म्हणाले महावितरणचे तांत्रिक कर्मचारी चुकीला माफी नसलेल्या क्षेत्रात 24 तास ओन ड्युटी काम करतात त्यामुळे ते सर्व कर्तुकास्पत्र आहेत वीज ही मूलभूत गरज असल्याने वीज सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे तसेच विद्युत कायदा 2003 मधील ग्राहका केंद्रित सावधानाचा विचार करून कर्मचाऱ्यांनी अधिक ग्राहकामभिमुख होण्याची यावेळी त्यांनी आवाहन केले होते.