पवन मनवर
तालुका प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : यवतमाळ तालुक्यातील सालोड या गावातील ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन व कामगार दीन साजरा करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य,सचिव व सरपंच आधी उपस्थित होते.सकाळी ग्रामपंचायत सालोड येथे महिला सरपंच सौ.लक्ष्मीबाई राजूरकर याचा हस्ते ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रेमजित मनवर,दिनेश चव्हाण,संजय मोहाड,तसेच ग्रामपंचयत कर्मचारी मंगेश भाऊ भंडारे व इतर गावकरी उपस्थित राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून १मे महाराष्ट्र दीन व कामगार दीन साजरा केला १मे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. हा दिवस मराठी भाषिकांसाठीचा आनंदाचा, उत्साहाचा दिवस आहे. १मे हा महाराष्ट्र दिन आहे. तर, कामगारांच्या न्याय अधिकारासाठी लढलेल्या संघर्षाचे स्मरण करण्याचा दिवस म्हणून ‘कामगार दिवस’ साजरा केला जातो. या पार्शवभूमीवर दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ग्राम पंचायत सलोड येथे कामगारांचे उद्धारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुजून व अभिवादन करून राष्ट्र ध्वजाला सलामी दिली.