बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
पुणे : निवडणूकीच्या निकालाच्या दिवशी भाजपाने 9 जागा जिंकत बाजार समिती मध्ये मोठ्या संख्येने शिरकाव करत कुल गटाने पकड मजबूत करत 9 जागा जिंकल्या आहेत. आज बाजार समितीची मतमोजणी झाली यामध्ये प्रथम ग्रामपंचायत मतदारसंघात आघाडी घेऊन भाजपाचे 4 उमेदवार निवडूण आले. सोसायटी मतदारसंघात सुरुवातीला अटीतटीची लढत पाहिला मिळाली. यामध्ये भाजपाचे 4 व हमाल मापाडीचे 1 असे 9 उमेदवार निवडून आले.आणि भाजपा कार्यकर्त्यांसह आमदार राहुल दादा कुल यांची दौंड शहरात मिरवणूक काढत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला. त्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस ने उर्वरीत 9 जागा जिंकत भाजपा च्या जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांना धक्का दिला आणि कहि खुशी कही गम अशी परीस्थिती निर्माण झालेली पाहिला मिळाली. निकालाच्या वेळी पाऊस चालू झाल्याने दोन्हीही पक्षातील कार्यकर्त्यांना काही वेळ आनंद साजरा करता आला नाही. दोन्हीही पॅनलचे समसमान उमेदवार निवडूण आले असल्याने घोडेबाजार पाहिला मिळणार अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगु लागली होती. आमदार राहुल कुल म्हणाले की सत्तेचा अहंकार झालेल्या पुढार्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवली. माजी आमदार रमेश थोरात यांना संपर्क केला आसता ते म्हणाले की जनतेने समसमान न्याय जरी दिला आसला तरी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन करणार. यावेळी भारत खराडे हे सोसायटी मतदारसंघातून केवळ ऐका मताने विजयी झाले आहेत. त्यामुळे पराभूत झालेले उमेदवार संतोष वरघडे यांना पराभव हा अतिशय जिव्हारी लागला आहे.