बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
पुणे : दिनांक 30 रोजी हि घटना
पाटस (ता. दौंड) येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विनोद गायकवाड हे त्यांच्या भावकीतील लग्नसमारंभ आटोपून लग्न मंडपातून बाहेर येत असताना दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये वार झाला असून त्यांच्या छाती व दंडावर ही जबर मारहाणीच्या खुना दिसत आहेत.गंभीर जखमी झाल्याने पत्रकार विनोद गायकवाड यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.याबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पत्रकार संरक्षण कायदा तसेच जिवे मारण्याच्या प्रयत्नाअंतर्गत आरोपिंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र मीडिया असोसिएशन तसेच पत्रकार संघाने केली आहे. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास पत्रकार संघटना आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बातम्या करतो म्हणून अपघाताचा बनाव करून नुकतीच एका पत्रकाराची हत्या करण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. आज पुन्हा एकदा जुन्या बातमीच्या रागातून पत्रकारावर भर लग्न समारंभात हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आरोपींवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास पत्रकार संघटना आक्रमक होतील. तसेच संबंधित पोलीस स्टेशन तात्काळ आरोपींना अटक करण्याची देखील मागणी पत्रकार संघटने कडून होत आहे.