पवन मनवर
तालुका प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : सतत एक आठवड्या पासून वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला असून जन जीवन विस्कळीत झालेले दिसून येत आहे.प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत यवतमाळ शहरात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली असून या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान केले आहे. शेतातली पले भाजी, तीळ,मुंग,तसेच ज्वारी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ..उभ पीक आत्ता जमीनदोस्त झालेलं दिसून येत आहे.अशातच पुन्हा येकादा बळीराजा चा डोळ्यांना पांझर फुटलं असून हातात आलेलं पीक जमीनदोस्त झालेलं दिसून येत आहे.हा उन्हाळा आहे की पावसाळा हे समजणे कठीण झाले.शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके जोरदार येतील हे स्वप्न पाहून पिकाच्या भरोषावर आपले रोजचे व्यवहार चालतील असे वाटले होते मात्र या अवकाळी पावसाने आपले आक्रोश दाखवून शेतकऱ्यांचे स्वप्न हिरावून नेले आहे.पहिलेच संकटात सापडलेला शेतकरी मात्र डोळ्यात अश्रु घेऊन प्रशासन कडून काही मदत मिळेल आत्ता या आशेसे वाट बगत बसलेला आहे.या अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकरी शेतमजूर सर्व सामान्य लोकांचे फार मोठे नुकसान झालेले दिसत आहे.तरीही अजून संकट टाळले नसल्याने सर्वांनी खबरदारी घावी असे आव्हान महसूल प्रशासन कडून करण्यात आले आहे…


