सतीश पाचपुते
तालुका प्रतिनिधी अकोले
अकोले : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अकोलेचे आमदार डॉ किरण लहमटे यांचे नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या समृद्धी मंडळाने तब्बल 11 जागा मिळवत माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या भाजपा प्रणित शेतकरी विकास मंडळाला पराभूत करत बाजार समितीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले . भाजपा प्रणित शेतकरी मंडळाला 7 जागेवर समाधान मानावे लागले. अकोले तालुका खरेदी विक्री संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने सत्ता मिळवत सलग सहकारातील संस्थांवर विजय मिळविल्याने माजी आमदार वैभवराव पिचड यांना राजकीय दृष्ट्या धोबीपछाड केल्याचे बोलले जाते .आमदार डॉ किरण लहमटे , अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन व अगस्ति साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर , काँग्रेसचे मधुकर नवले , ठाकरे गटाचे मच्छिंद्र धुमाळ यांचे नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने मतदारांचा विश्वास मिळवत आपली सत्ता प्रस्थापित केली . मतमोजणी नंतर वाजतगाजत आमदार लहामटे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली . कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता .
उमेदवार निहाय पडलेली मते व विजयी पुढील प्रमाणे शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार पुढीलप्रमाणे-
- सर्वसाधारण मतदार संघासाठी
विश्वनाथ विठ्ठल आरज,,(शेतकरी विकास)–४५७ ( विजयी)
योगेश गजानन आरोटे,(शे.समृद्धी)– ४९२( विजयी)
किरण प्रताप देशमुख,(शेतकरी विकास)–४५२(पराभूत)
अशोक कारभारी उगले,,(शेतकरी विकास)– ४५६ (पराभूत)
सुनील रोहिदास रंधे,,(शेतकरी विकास)—(
कैलास गंगाधर कानवडे,,(शेतकरी विकास)– ४४४(पराभूत)
रामनाथ नागू भांगरे,,(शेतकरी विकास)— ४३६ (पराभूत)
रावसाहेब विठ्ठल वाळुंज,(शेतकरी विकास)– ४४३ (पराभूत)
भास्कर बाळाजी खांडगे,(शे.समृद्धी)– ४९४ ( विजयी)
राम बन्सी सहाणे,(शे.समृद्धी)– ४४० (पराभूत)
सचिन हाैशिराम रंधे,(शे.समृद्धी)– ४६५ ( विजयी)
ईश्वर सोमनाथ वाकचाैरे,,(शे.समृद्धी)– ४७५ (विजयी)
रुपेश धोंडिबा कचरे,(शे.समृद्धी)– ४७७ ( विजयी)
रोहिदास जिजाबा भोर ,(शे.समृद्धी)– ४७६ (विजयी)
बुळे निबा सखाराम (अपक्ष) –०४ (पराभुत)
शेणकर भाऊसाहेब महादु -(अपक्ष) –०३ (पराभूत)
- महिला राखीव मतदार संघ
सौ.नंदा सदाशिव कचरे ,(शेतकरी विकास)– ४८० (पराभूत)
सौ मंदा गणपत बराते,(शेतकरी विकास)– ४७३ (पराभूत)
साै स्वाती तुकाराम कोरडे,(शे.समृद्धी) — ५१० (विजयी)
साै. मंगल अनिल भांगरे(शे.समृद्धी)– ५०३ (विजयी) - ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ
अर्जुन दत्तू गावडे,,(शेतकरी विकास)– ५१८ (पराभूत)
संतोष रामनाथ तिकांडे,(शेतकरी विकास)–५०८ पराभूत)
रामकृष्ण अण्णासाहेब आवारी (शे.समृद्धी)– ५६९ (विजयी)
भाऊसाहेब पाडुरंग नाईकवाडी(शे.समृद्धी)– ५३४ (विजयी) - इतर मागास प्रवर्ग
बाळासाहेब गणपत सावंत,(शेतकरी विकास)–५०२ (विजयी)
विकास आत्माराम बंगाळ (शे.समृद्धी)– ४८१ (पराभूत)
सुमिरन विलास मालुंजकर (अपक्ष) ०४ (पराभूत) - आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ
केशव अर्जुन बोडके,(शेतकरी विकास)– ५०४ (पराभूत)
भानुदास बोल्हाजी तिकांडे. (शे.समृद्धी)– ५९० (विजयी) - व्यापारी मतदार संघ
इनामदार अब्दुल महंमद ,(शेतकरी विकास)– १०६ (विजयी)
किरण हरिभाऊ कानकाटे,(शेतकरी विकास)- १०८ (विजयी)
मंगेश सुनिल नवले (शे.समृद्धी)– ८४ (पराभूत)
नवनाथ नाना वाळुंज (शे.समृद्धी)–९० ( पराभूत)