नागसेन अंभोरे
तालुका प्रतिनिधी बाळापूर
अकोला : बाळापूर तालुक्यातील देगांव येथील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजानिक वाचनालयात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर इंगळे यांनी कामगारांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी अजय अंभोरे , ग्रंथपाल नागसेन अंभोरे, मनोहर इंगळे यांनी महाराष्ट्र ही संतांची, महापुरुषांची भूमी आहे असे सांगत आपले उत्तम विचार प्रकटीकरण केले. याप्रसंगी संदीप इंगळे, धर्मेंद्र इंगळे, वैभव इंगळे, विजय इंगळे, चंद्रशेखर अंभोरे, अंकुश इंगळे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी अनिकेत जंजाळ यांनी आभार मानले.