अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : दि – 08 मार्च रोजी धनेश्वरी मानव विकास मंडळ द्वारा संचालित आमदार डॉ.राहुल पाटील शैक्षणिक संकुलातील आयुर्वेद रुग्णालयात आज जागतिक महिला दिनानिमित्त पार पडलेल्या भव्य स्त्रीरोग चिकित्सा शिबीराचा लाभ स्थानिक पातूर वासीयांनी घेतला आहे.बहुसंख्य महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. महिलांच्या आरोग्य समस्येचे निराकरण करून त्यांना योग्य औषध उपचार करण्यात आले.संस्थेचे संचालक डॉ.साजिद सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.हर्षवर्धन मालोकार, डॉ.प्रीती कराळे, डॉ. निलेश थोरात,जीवन देशमुख, प्राचार्या डॉ.जयश्री काटोले , उपप्राचार्य डॉ.अभय भुस्कडे, डॉ.शैलेश पुंड,डॉ. सुनीता कदम,डॉ.किरण इंगळे, डॉ.स्नेहा धकीते, डॉ. मनीष खंडारे, डॉ.प्लास्मा वक्ते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अतकर, या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाविद्यालय स्त्रीरोग व प्रसूती विभाग प्रमुख डॉ. कुटासकर, डॉ.ऋतुराज मोरे त्यांच्या विभागांतर्गत हे स्त्रीरोग शिबिर संपन्न झाले.शिबिरात विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ. हर्षवर्धन मालोकार यांनी आपल्या सोप्या व रसाळ शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले धनंजय मिश्रा यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत निकम यांनी केले.शिबीर यशस्वी करण्यासाठी , मधुकर राठोड, प्रभाकर कवर,अनिल सपकाळ,शरद अवचार, रमेश पोहरे, संदीप गिऱ्हे,वसंता पोहरे यांनी नियोजन केले होते आरोग्य शिबिरात ८५ रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आले.