अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : पातुर येथील शिवाजी नगर येथे आमदार नितिन देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजाचे अश्वरुढी पुतळ्याचा अनावरणाचा ऐतीहासीक सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. पातुर शहरातील शिवाजी नगर येथे अर्धाकृती छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा होता.परंतु या पुतळा परीसरात सौदंरीकरण नसल्याची खंत व्यक्त होत असतांना बाळापुर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी पुतळा परीसर सौदंरीकरणा करीता 25 लाखरुपये निधी दील्याने या परीसरात मोठ्या प्रमणात सौदंरीकरण करण्यात आले.शिवाजी नगर परीसर व शहर वासीयांनी लोकवर्गणी करुन भव्य अश्वरुढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे निर्माणीकरण केले. या ऐतिहासिक अनावरण सोहळा आमदार नितीन देशमुख , काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचीटणीस प्रकाश तायडे ,शहरप्रमुख निरजंन बंड , तुकारामजी ढोणे,दीलीप डोंगे , दीपक देवकर, बबलु देशमुख , परशरामजी उंबरकार ,सै कमरोद्दीन , विष्णु ढोणे पैहलवान , संतोष देवकर ईत्यादी मान्यवर उपस्थीत संपन्न झाला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महीला पुरुष भगवे फेटे घालुन शिवप्रेमीची उपस्थीती होती. अनावरण सोहवळा यशस्वी करण्याकरीता संजय आवटे, राजु इंगळे , संजय पेढांरकर नविन करंगाळे सचीन लाहुळकर मनोज पेढांरकर संतोष पेढांरकर ईश्वर पेढांरकर बबलु गोतरकार यांच्यासह शेकडो युवकांनी अथक परीश्रम केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रदीप काळपांडे इंगळे यांनी केले.