अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अमरावती येथे संबोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडीच्या वतीने प्रा.सतेश्वर मोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वक्तृत्व करंडक 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अकोला विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी संतोष हागोणे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. प्रा. सतेश्वर मोरे यांनी आपल्या हयातीत वक्तृत्व कलेतून समाजात प्रबोधन केले आहे. तेव्हा या वक्तृत्व कलेच्या माध्यमातून समाजात वक्ते निर्माण व्हावे व त्यांनी समाजामध्ये प्रबोधन करावं या उदांत हेतूने या स्पर्धेचं आयोजन गेल्या दोन वर्षापासून केल्या जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातुन स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यात कु.वैष्णवीने सर्वोत्कृष्ट सादरीकरण करत पहिले पारितोषीक प्राप्त केले. बक्षिसाचे स्वरूप हे रोख रक्कम ५०००-, सन्मान चिन्ह, फिरता करंडक आणि प्रमाणपत्र असे ठेवण्यात आले होते. वैष्णवीने केल्येल्या या कामगिरीमुळे सर्व स्तरावरून तिचे कौतुक केले जात आहे. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कारभवन भिमटेकडी येथे पार पडला.