सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : तालुक्यातील सुकळी (जहागीर )जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा सुकळी ( जहागीर )प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य शाळेत यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले काय होत्या हे वर्णन केले. शाळा व्यवस्थापक समिती उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शकील खान चांद खान पठाण यांनी सावित्रीबाई फुले जयंती औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा 8 कॅलेंडर (कालनिर्णय) सप्रेम भेट दिले. यापूर्वी शकील खान पठाण यांनी जिल्हा परिषद मराठी शाळेला. महापुरुषांचे 21 फोटो भेट दिले आहेत. तसेच सुकळी ( जहागीर )गावातील जिल्हा परिषद उर्दू शाळेला सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा भेट दिली व एक कॅलेंडर भेट दिले व अंगणवाडी नवीआबादी सावित्रीबाईंचे प्रतिमा आणि एक कॅलेंडर सप्रेम भेट दिले गावातील दोन्ही अंगणवाडी ला सावित्रीबाईफुले यांचे 2 प्रतिमा सप्रेम भेट देऊन शकील खान पठाण यांनी दैनंदिन रोज मजुरी करून त्यांनी अशा विविध वस्तू महापुरुषांचे प्रतिमा त्यांनी आपले स्वखर्चाने अनेक वेळा शाळेला सप्रेम भेट दिली आहे त्यांच्या ह्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे महापुरुषांचे फोटो भेट दिले शकील खानपठाण म्हणाले, प्रत्येक शासकीय कार्यालयात महापुरुषाचे फोटो असावेत. महापुरुषांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची व कर्तव्याची जाणीव भावी पिढीला व्हावी व महापुरुषांची प्रेरणा व आदर्श भावी तरुण पिढीमध्ये निर्माण व्हावी या मुख्य उद्देशाने सुकळी गावातील शाळा अंगणवाडी महापुरुषाचे प्रतिमा सप्रेम भेट दिली, यावेळी मोठ्या संख्येने गावातील पालक तथा महिला वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शकील खान पठाण, मुख्याध्यापक श्री.बी.एल इनकर स शी सौ.कल्पना पांडे, कु.किरण ठाकरे, सौ.रंजना मुनेश्वर , श्री संतोष आपसवार व कु.सुजाता किडीले व गावातील शेख गफार सय्यद खाजा व पालक वर्ग उपस्थित होते.