गजानन माळकर
तालुका प्रतिनिधी मंठा
मंठा : येथील रेणुका माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक ज्ञानेश्वर बुलबुले उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुजाता शिंदे म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची द्वारे खुली करून स्त्रीच्या पंखात बळ निर्माण करण्याचे काम केले. त्यांच्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री आपले कर्तृत्व सिद्ध करताना दिसत आहे. स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी उपसलेले कष्ट कधीही विसरून चालता येणार नाहीत. याप्रसंगीत प्रा.के.बी चव्हाण, प्रा.साधना जुंबड, प्रा.प्रदीप देशमुख यांच्यासह विद्यार्थ्यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस. पी.राठोड यांनी केले, तर आभार अशोक गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर शिंदे,अच्युत राठोड , तुळशीराम गायकवाड, रंजित जाधव यांनी परिश्रम घेतले. यावेळी श्रीमती बोराडे, प्रा. संजय गोर्डे, राजेश राठोड, गोविंद जाधव, आर. पी. राठोड आदी उपस्थित होते.