कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : तालुक्यातील शेतकऱ्यांना चालू वर्षात पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच आजपर्यंत न मिळालेली म.फुले शेतकरी सन्मान निधीचे अनुदान त्वरित देण्यात यावे या मागणीसाठी हिवळणी तलाव येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. आज पहिल्या दिवशी तांडा सुधार समितीचे तालुका अध्यक्ष संजय मदन आडे व सहकाऱ्यांनी मुंडण करून निषेध नोंदविले.पुसद तालुक्यात मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीच्या भीतीमुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा काढला होता. परंतु मोजक्याच शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला. ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळालाच नाही. ज्या काही २० टकके शेतकऱ्यांना हा लाभ मिळाला त्यात काही शेतकऱ्यांना तर जेवढा विमा भरला होता त्याहीपेक्षा कमी लाभ मिळाला. अर्ज विनंती करून प्रशासन ऐकत नसल्याचे लक्षात आल्यामुळे शेतकऱ्यांनी मा. तहसीलदार पुसद यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री मा. महसूलमंत्री यांना तांडा सुधार समितीच्या बॅनरवर निवेदन पाठवून २९ डीसेंबर पासून हिवळनी तलाव येथे बेमुदत उपोषण व मुंडण आंदोलन करणार असल्याचे कळविले होते.
त्यानुसार संजय मदन आडे तालुकाध्यक्ष तांडा सुधार समिती, कुबेराव मस्के तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, सुनिल देवराव चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, गजानन इंदोरीया उपसरपंच हिवळणी, शैलेश सरगर सामाजिक कार्यकर्ते,पवन सुभाष राठोड जिल्हा सचिव व्हीजेएनटी सेल,गजानन धावजी राठोड सामाजिक कार्यकर्ते,दुर्गादास महाराज समाज सेवक, सुभाष पूना राठोड सामाजिक कार्यकर्ते, पंडित पवार यांनी आजपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली असल्याचे संजय आडे यांनी कळविले आहे.


