गजानन माळकर
तालुका प्रतिनिधी मंठा
मंठा : तालुक्यातील उस्वद रोडवर मंठ्याकडे बाभळीची मोठ मोठी हिरवी झाडे तोडून विना नंबर ट्रॅक्टर मधून अवैध वाहतूक करतांना जिल्हाधिकारी नियुक्त भरारी पथकाने सोमवारी सायंकाळी पकडला . सदर ट्रॅक्टर मंठा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे . मंठ्यातील लाकूड व्यापाऱ्यांकडून तळणीसह परिसरातील अनेक गावांत बेकायदेशीर हिरवी झाडांची खरेदी करून वृक्षतोड व वाहतूक सरास केली जाते . या अवैध वृक्षतोडीच्या तक्रारीही प्रशासनाकडे आल्या आहेत . मात्र , पोलिस व महसूलच्या ‘ अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे कोणतीच कारवाई होत नव्हती अखेर भरारी पथकातील नायब तहसीलदार एस . यु . शिंदे , पी व्ही . दवणे तलाठी नितीन चिंचोले , पोलिस हेड . कॉ . संजय कुटे व दीपक इंगळे यांनी अवैध वृक्षतोडीचा ट्रॅक्टर पकडून चौकशी केली असता सोबत लाकूड तोड परवाना आढळून न आल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६चे कलम २८ चे उल्लंघन व महाराष्ट्र जमीन महसूल ( लाकूड तोड व लाकडाचा पुरवठा इ.नियम )१९७० चे उल्लंघन केल्याचे सकृत दर्शनी दिसून आल्याने सदर ट्रॅक्टर त्यातील लाकडासह जप्त करून के.एस.चव्हाण ( पी.एस.ओ.पो.स्टे मंठा) यांच्या ताब्यात दिल्याची माहिती तलाठी नितीन चिंचोले यांनी दिली . सदरील विना नंबर चा ट्रॅक्टर हा मंठ्यातील लाकूड व्यापारी सादिक भाई यांचा असल्याची माहिती तलाठी नितिन चिंचोले यांनी दिली. माहिती दरम्यान अशा प्रकारची कारवाई नियमित झाल्यास तालुक्यातील अवैध वृक्षतोडीला लगाम लागेल . अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे