गजानन माळकर
तालुका प्रतिनिधि मंठा
मंठा : दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतिने मंठा नगरपंचायत समोर निदर्शने करण्यात आले व मुख्याधिकारी हजर नसल्याने मुख्याधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध व्याक्त करण्यात आला. दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी ( ता.२६ ) रोजी मंठा नगरपंचायत, तहसील कार्यालय व पंचायत समितिवर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढण्यात आला होता.ज्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना ५% निधी तात्काळ वितरित करण्यात यावा,दिव्यांग विधवा,बेघर,गरिब,कष्टकरी,शेतमजूर यांना घरकूल देण्यात यावा, दिव्यांगाना अंत्योदय योजनेतून तात्काळ राशनकार्ड द्यावे,दिव्यांगाना सामाजिक न्यायविभागा अंतर्गत येणाऱ्या योजनांचा अर्ज निकाली काढून त्यांना तात्काळ मानधन वितरित करावा,शासन निर्णय प्रमाणे व्यावसयासाठी गाळे वाटप करण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालय यांनी दिव्यांगांची नोंदणी करून तात्काळ संबंधित कार्यालयास त्याची आकडेवारी द्यावी,दिव्यांग लाभार्थ्यास शौचालयासाठी अनुदान द्यावे, प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांगासाठी व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात यावी. अश्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख रविंद्र अंभोरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात असंख्य दिव्यांग बांधवासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.