गजानन माळकर
तालुका प्रतिनिधी मंठा
मंठा : माळकिनी येथील सरपंच उपसरपंच व सदस्य सह शेकडो युवकांचा बाळासाहेबाची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या उपस्थितीत माळकिनी येथील सरपंच जगदीश जाधव उपसरपंच सिद्धेश्वर जाधव व सदस्य भागवत खणके, विलास खणके, सुधाकर गाढे सह गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्यावर विश्वास ठेवत बाळासाहेबाची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य सहकार्यकर्तेचा सत्कार शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी मा सभापती तथा बाजार समिती संचालक प्रल्हादराव बोराडे उप तालुका प्रमुख गजानन कापसे विलास राठोड युवा सेना शहर प्रमुख अॅड राजेश खरात संभाजी केंद्रे भाऊसाहेब उकंडे रामतीर्थ शाखा आध्यक्ष विष्णु झोलआदी सह कार्यकर्त्याची उपस्थिती होती.यावेळी सरपंच उपसरपंच यांना मार्गदर्शन करताना उदयसिंह बोराडे म्हणाले की, कमी कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायत बाळासाहेबाची शिवसेना यांच्यावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करत आहेत.


