अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : ३०/१२/२०२२ स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातूर येथील प्रथमेश संतोष पवार या विद्यार्थ्याचे 65 किलो वजन गटात ज्युडो कुस्ती या खेळाच्या प्रकारात सतरा वर्ष वयोगटातील स्पर्धेत राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.क्रीडा व युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला आणि विभागीय कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विभागीय स्तरीय स्पर्धा अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये प्रथमेश पवार वर्ग बारावा विज्ञान शाखा मधील विद्यार्थी तुळशीच्या लढतीत मात करत प्रतिस्पर्धी खेळावरती वर्चस्व गाजवत दणदणीत असा विजय निश्चित केला आपल्या कुशल आणि चाणक्य शैलीचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धीला घेऊन चाली त्याच्या या प्रदर्शनाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. प्रथमेश पवार यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अंशुमानसिंह गहीलोत , उपप्राचार्य एस.बी.चव्हाण , उपमुख्याध्यापिका रश्मी ढेंगे मॅडम ,पर्यवेक्षिका एम.बी परमाळे, जगमोहनसिंह गहिलोत, बिपीनसिंह गहीलोत तसेच क्रीडाशिक्षक संजय मुखाडे, एस. आर.खाडे , पंकज राणे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. आपल्या यशाचे श्रेय प्रथमेश आई वडील आखाड्यातील त्याचे मार्गदर्शक शिक्षक – विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तसेच सहकारी मित्रांना देतो.