सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : सुकळी जहागीर ज्ञानप्रकाश विद्यालय सुकळी जहागीर ता. उमरखेड येथे ढोल ताशा वाजत गाजत ज्ञान प्रकाश विद्यालयाचे बॅनर घेऊन सुकळी (ज. )गावात नऊ वाजता पूर्ण गावात माननीय शिक्षणाधिकारी साहेब (माध्य.) यवतमाळ यांचे आदेशान्वये प्रभात फेरीचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांनी अतिशय उत्सफुपुर्तपणे विविध नारे देऊन त्यामध्ये ”दारू पळवा गाव वाचवा, कशापाई दारू पिता आपल्या घराला उद्ध्वस्त करता” असे विविध नारे देत सुकळी जहागीर येथील लोकांनी प्रभात फेरीमुळे लक्ष वेधून घेतले होते.लहान चिमुकले विद्यार्थी विद्यार्थिनी खरोखर किती महत्त्वाचे चांगले संदेश आहेत त्याचे पालन ग्रामस्थांनी केले पाहिजे असे सुकळी जागीर येथील ग्रामस्थांमध्ये चर्चा होती. विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीचे नवीन वर्षाचा उत्साह धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे करा असा संदेश देण्यात आला. विद्यालयाचे पाच ते दहावीचे विद्यार्थी. प्रभात फेरीमध्ये सुकळी जहागीर विद्यालय.मुख्यध्यापक श्री पी. ए.दुधे.सर.एस.ए. शिंदे सर. पी जे देशमुख सर. एस पी वाठोरे सर सौ. एस के कदम मॅडम. के व्ही ताटीकुंडलवार सर. एस एम अंभोरे. एम बी गंगात्रे सर. सुकळी येथील सरपंच शिवाजीराव रावते सामाजिक कार्यकर्ते शेख हमीद व्ही आर चव्हाण मामा. आर.सी काळबांडे मामा. एल व्ही राणे सर. सी.भी.बडेराव सर. कुमारी व्ही पी दुधेवार मॅडम. कुमारी एस आर काळे मॅडम. मोठ्या उत्साहाने प्रभात फेरी काढण्यात आली