सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड : येथील करंजी शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत करंजी येथील शेतकरी खरीप पिकासाठी विमा भरला आहे. तालुक्यात झालेला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अटी व शर्तीमुळे मोजा करंजी येथील बहुसंख्या शेतकरी विमा पासून वंचित राहिला आहे. करंजी गावातील शेतकरीयांचे पिक विमा शेतकऱ्यांची होणारी फसवणुका मुद्दा ऐरणीवर आलेला आहे मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई अदा करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे करंजी येथील शेतकरी उमरखेड तहसीलदार व उमरखेडउपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिला करंजी गावातील सरपंच शुद्धोधन जयघोष घुगरे शेतकरी उपस्थित होते.