सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड : नागपुर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये शिंदे व फडणवीस सरकारच्या नियमबाह्य प्रचंड भ्रष्टाचार करून घेतलेला निर्णयावर अधिवेशनामध्ये विरोधीपक्षाच्या वतीने सरकारचे मोठे प्रश्न निर्णय चर्चेत आणल्याजाऊ लागल्यामुळे सरकार प्रचंड तणावाखाली अधिवेशन चालवत आहे. विरोधी पक्षनेते अजित दादा पवार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांनी सरकारचे वाघोडे काढल्यामुळे सरकारला कोणत्याही परिस्थितीत पक्षाचा आवाज बंद करण्याचा होता. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील यांनी सरकारच्या अनेक भ्रष्ट प्रकरण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असंसदीय भाषा वापरली असे जुजबी कारण लावून यांनी जयंत पाटील यांना निलंबित करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतल्याच्या निषेधार्थी उमरखेड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने निषेध आंदोलन करण्यातआला.या आंदोलनात माननीय जयंत पाटील साहेब यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबन कारवाई त्वरित रद्द करावी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना निवेदन देण्यात आले अशी मागणी करून सरकार विरोधी मोठ्याप्रमाणात घोषणा करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष शंकरराव तालंकर तालुका युवक अध्यक्ष बबलू जाधव व जाकिर राज.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व फ्रटंलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.