सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड : ग्रामीण तसेच शहरी विभागातील बालकांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी शासनाच्या विविध योजना असलेल्या कार्यालयापैकी एक एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय होय. सदर कार्यालयात आज दिनांक २२/१२/२०२२ रोजी दुपारी १:३० वाजता योजनांची माहिती घेण्याकरिता जिजाऊ ब्रिग्रेड च्या जिल्हाध्यक्षानी भेट दिली असता कार्यालयात एकही अधिकारी कर्मचारी हजर नव्हते (तसेच कार्यालयाचे भिंतीवर फलक सुद्धा नाही) सदर कार्यालय सताड उघडे होते.एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय उमरखेड येथे शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण/शहरी भागातील बालकांचे सक्षमीकरण होण्याचे दृष्टीने विविध योजना कार्यान्वित असून या योजनांची माहिती घेण्याकरिता ग्रामीण भागातून तसेच शहरी भागातून जनता येत असते. आज रोजी जिजाऊ ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष सौ सरोज देशमुख यांनी दुपारी १:३० वाजता बालकांकरिता असलेल्या योजनांची माहिती घेण्याकरिता सदर कार्यालयास भेट दिली असता कार्यालय सताड उघडे होते, दर्शनी भागावर कार्यालयाचे फलक सुद्धा नसून कार्यालयामध्ये एकही अधिकारी कर्मचारी नसल्यामुळे कार्यालय कोणाच्या भरोशावर चालते हे एक मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन कार्यालयाचा कामकाजात सुसूत्रता आणावी अशी जिजाऊ ब्रिगेड यांची मागणी असून या बाबीवर काय कार्यवाही होते याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष देऊन आहोत अशी माहिती दिली आहे.