सय्यद रहिम रजा
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : तालुक्यातील सुकळी नवीन हे 900 लोकवस्तीच गाव असून येथील सरपंच सचिव यांनी तालुक्यावरील अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी घेऊन भ्रष्टाचाराची सीमा ओलांडली आहे. रो. ह. यो. असो की घरकुल योजना,15व्या वित्त आयोग किंवा इतर सर्व योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. या सर्व प्रकरणाची तक्रार ग्रा.प. सदस्य यांनी अनेक वेळा करून सुद्धा अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सदर सदस्यांनी केला आहे. त्यामुळे या भ्रष्ट सरपंच सचिवांची तक्रार थेट पालकमंत्री संजय राठोड यांनी आयोजित केलेल्या समाधान शिबिरा मध्ये केली आहे. तक्रार दाखल केल्यामुळे भ्रष्ट कर्मचारी अधिकारी यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. त्यामुळे या प्रकरणाची घाई- घाईने चौकशी करून अहवाल सादर केला. त्या चौकशी अहवालात स्पष्ट नमूद केले. की सुकळी नवीन येथील वृक्ष लागवड मधील वृक्ष 95% टक्के जिवंत असून शासनाच्या सर्व नियम व अटी नुसार काम चालू आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातील मजुरांना काम मिळण्यासाठी योजना अमलात आणलेली आहे. परंतु या योजनेमधील वृक्ष लागवड मध्ये मजूर कामाला न लावता. मोटर पंपाच्या साह्याने कॅनॉल मधील पाणी दिला जाते.व खोटे मस्टर टाकून बिले काढतात आली आहेत. हे विस्तार अधिकारी यांनी डोळ्यांनी बघितले असून सुद्धा शासनाच्या नियम व अटीनुसार काम चालू आहे. असा खोटा अहवाल सादर केला आहे. विशेष म्हणजे वृक्ष लागवड मध्ये रोजगार हमी योजनेतून दोन वर्षात 553332 -/रुपये खर्च झाला. व 50टक्के झाडे 6 ते 7इंचाचे आहेत.म्हणजेच “‘तोच खड्डा, नवीन झाड”‘ ही मोहीम चालू आहे. त्याला सरपंच सचिवासह कर्मचारी व अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत. असे लक्षात येते. कारण निष्पक्ष चौकशी न करता फक्त समाधान शिबिर मध्ये चौकशी अहवाल सादर करावा म्हणून ही आटापिटा चालू आहे. वरील चौकशी अहवालाची प्रत तक्रारदारा कडे नेली असता. त्यांनी सदर चौकशीअहवाल स्वीकारून त्यांच्या o/c च्या प्रत वर सदर चौकशी अहवाल मला मान्य नसून सदर वृक्ष लागवड याची चौकशी माझ्यासमोर करावी. असा शेरा दिला हे विशेष तक्रारकर्त्या समोर अद्याप चौकशी झाली नसल्यामुळे त्यांनी थेट पालकमंत्री संजय राठोड यांच्या जनता दरबारात जाण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आता यावर काय कारवाई होईल याकडे लक्ष सर्वांचे लक्ष लागले आहे.