सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड : पोफाळी वसंतनगर उपकेंद्र येथे अंध मूकबधिर शाळेच्या मुलांना मोफत तपासणी करण्यात आली. या प्रामुख्याने शाळेतील अंध व मूकबधिर यांचा समावेश होता. या प्रसंगी तालुका सिकलसेल सायक अश्विनी मगर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यांनी सांगितले की, सिकलसेल हा एक असा आजार आहे जो रक्तातील हिमोग्लोबीन वर वाईट परिणाम करतो. त्यामुळे लाल रक्तपेशीचा आरबीसी आकार खराब होतो आणि लोकांना अनेक समस्या येतात. या आजारावर योग्य उपचार न केल्यास आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सिकलसेल रोगामुळे रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये असामान्य HB तयार होतात. त्यामुळे लाल रक्तपेशीचा (RBC) आकार बिघडतो हिमोग्लोबिन शरीरातील सर्व पेशींना पुरेसा ऑक्सीजन पोहोचण्याचे काम करते, परंतु या आजारात या कामात व्यत्याय येतो त्यामुळे सिकलसेल ॲनिमिया सिकल सेल थलेसेमिया यासह अनेक आजार होतात. त्यामुळे दीर्घकाळ गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. सामान्य रक्तपेशी वाटोळ्या आकाराच्या असतात सिकलसेल झाल्यावर त्या विला आकाराच्या होतात याची लक्षणे अशक्तपणा सांधेदुखी, सांधे सुजणे शरीर पिवळे असह्य असणाऱ्या लाल रक्तपेशी कोयत्याच्या आकार घेतात.की सामान्य रक्तपेशी वाटोळ्या आकाराच्या असतात सिकलसेल नेमकं कशामुळे होतो त्याची लक्षणे उपचार पद्धती काय आहे या जाणून घेऊया, सिकलसेल चा आजार म्हणजे काय हा प्रश्न अनेकांना पडतो ही एका पिढीतून पुढच्या पिढीत जाणारी रक्तव्याधी आहे जिच्यात हिमोग्लोबिनचा बदल दिसून येतो.सिकलसेल सप्ताह साजरा तालुका सिकल सेल सहाय्यक अश्विनी मगर मॅडम आरोग्य सेविका लोणे मॅडम आरोग्य सेवक अंबादास धुळे सर.दरून सर व हिंगमिरे सर व आशाताई उपस्थित होत्या. के डी जाधव मूकबधिर तसेच रेणुका जाधव अंध विद्यार्थी शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आले.
सिकलसेल आजाराची लक्षणे.!
रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी होणे, भूक मंदावणे, हातापायावर सूज येणे, सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, सिकल सेल आजाराची लक्षणे बद्दल थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. उपकेंद्र येथे सिकलसेल तपासण्या करण्यात आली.


