अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : 15 डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. या दिवशी लोकांना ऊर्जेचे संरक्षण आणि बचत करण्याच्या महत्त्वाबद्दल जागृत केले जाते. वीज आणि विजेचा वापर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तिचा योग्य वापर हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. हाच विचार घेऊन पातूर येथील एज्युकेशनल कम्प्युटर अकॅडमी यांनी ऊर्जेचे संरक्षण हेच ऊर्जेचे संवर्धन कार्यशाळेचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक किड्स पॅराडाइज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे होते तर, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक व ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले लाभले होते. गोपाल गाडगे यांनी ऊर्जा संरक्षण काळाची गरज या विषयावर उपस्थिततांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले, तर देवानंद गहिले यांनी आपल्या प्रभावी शैलीमध्ये विजेचे महत्त्व समजावून सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन एज्युकेशन कंप्युटर सेंटरचे संचालक दीपक राखोंडे सरांनी केले तर कार्यक्रमाकरिता एज्युकेशनल अबॅकस अकॅडमीच्या कॉर्डिनेटर प्रणिता राखोंडे,शुभम बोरकर, विठ्ठल घेघाटे,कु.दिपाली खाकरे तसेच एज्युकेशनल कंप्युटर सेंटरचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.











