अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला : सिध्दार्थ विहार कनिष्ठ महाविद्यालय पास्टुल चे कोठारी खु. येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीराचा दि. १६/१२/२०२२ रोजी समारोपीय समारंभ संपन्न झाला. समारोपीय समारंभाला राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. भास्करराव काळे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ.मोहम्मद नदीम यांनी कोरोना लसीकरणाबाबत माहिती दिली.यावेळी आरोग्यसेविका जयश्री माहुलीकर यांनी स्वंयसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनचे महत्व पटवुन दिले तसेच स्वच्छते बरोबर स्वताःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य सिध्दार्थ वानखडे यांनी स्वयंशिस्त व समाजसेवेचे महत्व पटवुन दिले. संस्थेचे सचिव कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेश इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सर्व सहभागी विद्यार्थी व प्राध्यापक,कर्मचारी यांचे कौतुक केले. दि. १०/१२/२०२२ पासून सुरु झाल्या शिबीरामध्ये अनेक मान्यवरांनी भेटी देवून स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्व व बुध्दीमत्ता विकास, संत गाडगे बाबांचे योगदान,कृषी विषयक मार्गदर्शन, कायदेविषयक मार्गदर्शन, अंधश्रध्दा निर्मुलन,आरोग्य संवर्धन या विविध विषयांवर, डॉ. शांतीलाल चव्हाण, ऍड. रविकुमार खांबलकर, ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले, द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे सहसचिव अविनाश पोहरे यांनी शिबीरांर्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये ग्राम स्वच्छता, योग, व्यक्तीमत्व विकास, सांस्कृतिक कार्यक्रम या विषयांवर विद्यार्थ्यांनी कार्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव शैलश प्रभुजी इंगळे होते. यावेळी कार्यक्रमाला प्रा. भास्कर काळे, प्राचार्य सिध्दार्थ वानखडे, समाजसेवक सुनिल गाडगे, डॉ. मोहम्मद नदिम, जयश्री माहुलीकर,व्ही. एम. कांबळे, आरोग्य सेवक, सचिन कुटे, शाहीद अली, अश्विनी कांवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पायल इंगळे, व आभार प्रदर्शन कु. तनिका इंगळे हिने केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण इंगळे प्रा.विनय खंडारे, प्रा.मंगेश इंगळे, प्रा.किर्ती किरतकार, प्रा.संगिता तेलगोटे, शिक्षकेत्तर कर्मचारी बळीराम वाणी,गजानन शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले.


