अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : शिर्ला – सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय पातुर अमरावती विभाग अमरावती अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर ग्राम विशेष शिबिर आयोजित दिनांक 19/12/2022 रोजी दुपारच्या बौद्धिक सत्रात व्यसनमुक्ती, व्यक्तीमहत्व विकास,कवी संमेनलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार देवानंद गहिले,प्रा.विठोबा गवई,प्रा.करुणा गवई, द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे सहसचिव अविनाश पोहरे, नारायणराव अंधारे यांनी सावित्रीबाई फुले व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारअर्पण करण्यात आले.
यावेळी रासेयो विशेष शिबिराला बौद्धिक सत्रामध्ये व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा या विषयावर शिबिरातील विद्यार्थ्यांना जेष्ठ पत्रकार देवानंद गहिले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे सहसचिव अविनाश पोहरे यांनी विद्यार्थी दशेत असतांना रासेयो आपल्याला शिस्त,आत्मविश्वास शिकवते तसेच युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे कार्य करते हे पटवून सांगितले. यावेळी सचिन ढोणे सचिव सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ पातुर प्राचार्य जे.डी. कंकाळ सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय पातुर कार्यक्रम अधिकारी हर्षल ढोणे, महिला कार्यक्रमाधिकारी माधुरी ढोणे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा वक्ते,अतिथी जेष्ठ पत्रकार देवानंद गहिले,प्रा.विठोबा गवई, प्रा.करुणा गवई,द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे सहसचिव अविनाश पोहरे, नारायणराव अंधारे यांची विचार मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.तसेच जेष्ठ नागरिक संघ शिर्ला व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी हर्षल ढोणे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी अजय कराळे यांनी केले.