सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड – नागपूर रूपाला : येथे जल जीवन मिशन नळ योजनेचा उद्घाटन सोहळा आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते संपन्न झाला. नागापूर रूपाला ग्रामपंचायत येथे जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत नीती मंजूर झाला असून सदर योजनेचे उद्घाटन आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा उपस्थित होते. या गावाचे सरपंच सुलावती डुकरे, उपसरपंच रहमत खान पठाण, सचिव मुंडे, ग्रामपंचायत सदस्य माधव चंदेवाड, राहुल पाईकराव, संतोष झांबरे, संतोष पुरी, देविदास जाधव, कैलास कदम, गफार खान शेख जावेद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक व आभार मोहसीन खान पठाण यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षण जावेद मौलाना रजा जमाली, महबूब खान पठाण, दत्ता इंगळे यांनी घेतली.


