कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी, पुसद
पुसद : संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन पुसद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या मध्यवर्ती पुतळा स्मारक येथे, प्रज्ञापर्व समिती 2022 च्या वतीने आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आला. “संविधान दिन चिरायू हो” च्या जय घोष देण्यात आला.यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील पंचशील घेऊन
संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी प्रामुख्याने उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक,भीमराव कांबळे प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष,विठ्ठल खडसे सर, अशोक भालेराव, राजेश ढोले राजेंद्र नाईक, प्रमोद धुळे भारत कांबळे अगमे सर प्रा. साखरकर सर, ल.पू. कांबळे. तसेच प्राध्यापक वानखेडे इत्यादी उपस्थित होते.या कार्यक्रमाला प्रज्ञापर्व समिती २०२२,पदाधिकारी व समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.


