अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला : 26 नोव्हेंबर, 1949 आणि 26 जानेवारी, 1950, भारतीय संविधानाच्या इतिहासातील ह्या दोन महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर,1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता. तर 26 जानेवारी, 1950 रोजी तो लागू करण्यात आलं. संविधान ज्या दिवशी स्वीकारलं त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी ‘संविधान दिन’ साजरा केला जातो.आज संविधान दिनाच्या निमित्ताने पातूर तालुक्यातील नामांकित शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक मध्ये अग्रेसर असलेली एकमेव संस्था द प्रोफेशनल करिअर बहूउद्देशीय शैक्षणिक संस्था पातूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हारार्पण व पूजन करून साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे सहसचिव अविनाश पोहरे,जेष्ठ पत्रकार देवानंद गहिले,जि.एम. देशमुख, प्रहार बहू.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल करवते, रमेश बांगर, नितेश राठोड,आशिष दाभाडे,रवि चव्हाण आदीं उपस्थित होते.


