अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला : २६ नोव्हेंबर ला भारतीय संविधान दिवशी अकोल्यातील तरुणांनी भारतीय संविधान हातात घेऊन “वॉक फॉर संविधान” प्रभातफेरी तरुणाईच्या उत्साहत संपन्न झाली. तसेच २६/११ च्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांना वाहिली श्रद्धांजली.भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने अकोल्यातील तरुणांनी तसेच अकोलेकरांनी मिळून मोठ्या प्रमाणात एकत्रीत येऊन वॉक फॉर संविधान ही प्रभातफेरी काढण्यात आली होती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करून वॉक फॉर संविधान प्रभातफेरीची सुरुवात करण्यात आली. रेल्वेस्थानकांपासून अग्रेसन चौक ,टॉवर चौक, मदनलाल धिंग्रा चौक, व अशोक वाटिके मध्ये तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या स्मारकास विद्यार्थ्यांनी फुले व हारअर्पण करून अभिवादन करण्यात आले. तिथून गांधी जवाहर बागेमध्ये महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्मारकास मान्यवरांनी फुले व हारअर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तेव्हा मान्यवरांसह तरुणांनी संविधाना विषयी आपले मनोगत व्यक्त केले.वॉक फॉर संविधान या प्रभातफेरी साठी संविधान प्रचारक लोक चळवळ, इंडियन स्पीकर्स फोरम, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रधर्म युवा मंच, राष्ट्रीय सेवा योजना श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय बाबुळगाव, मराठा सेवा संघ,अकोला. साथ सेवक फाऊंडेशन, युवास्फुर्ती फाऊंडेशन.अक्षय राऊत, आकाश पवार, विकास जाधाव, अजय वाहुरवाघ, सुशील तुरकाने नम्रता आठवले, अमोल भटकर, गौरी सरोदे, पूजा काळे, आर जे गौरव, विजय कौसल, प्रशांत गावंडे, आ.अमोल मिटकरी, रामेश्वर बरगट, अशोक पटोकार, प्रशांत भारसाकल, झिशान हुसेन, मधू कोठारी खान, प्रशांत वानखेडे, अक्षय ओहाळ, सिद्धांत नितोने, व शेकडोच्या संख्येने संविधान प्रेमी उपस्थित होते.
“भारतीय संविधानाने आपल्याला गर्भात असल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत संरक्षण दिलं. प्रत्येकाला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं. चालणे,बोलणे,लिहणे, वाचणे, न्यायासाठी भांडणे एवढंच नाही तर आपण जे काही उपभोगतो ते सर्व संविधानमुळे आणि म्हणून संविधानाचा जागर व्हावा या करीता वॉक फॉर संविधान प्रभातफेरी काढली आणि सतत काढत राहू!”
- अक्षय राऊत (संविधान प्रचारक)