अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
पातूर – आस्टूल : दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. आज आस्टूल येथे संविधान दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार देवानंद गहिले,प्रमुख पाहुणे जि.एम देशमुख,द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे सहसचिव अविनाश पोहरे,रमेश बांगर, आशिष दाभाडे,राहूल करवते, सचिन इंगळे, रविकांत कांबळे, अक्षय इंगळे आदीं उपस्थित होते.


