अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
अकोला : आज २६ नोव्हेंबर २०२२ रोजी तुलंगा बु येथे ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तथा ग्रामीण युवा संघटनेच्या वतीने “भारतीय संविधान गौरव” दिनानिमित्त आयोजित संविधानाबद्दल गावामध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सर्वप्रथम सम्यक संबोधी बुध्द विहार तुलंगा बु येथे महापुरुषांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले व शाळकरी विद्यार्थ्यांना “भारतीय संविधान” विषयी मार्गदर्शन करण्यात आले. नंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन भारतीय संविधानाचे तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व उपकेंद्र ग्रामीण रुग्णालयामधील कर्मचाऱ्याना सुद्धा भारतीय संविधानाचे महत्व सांगुण उद्देशिका देण्यात आल्या नंतर गावामधे ग्रामीण युवा संघटनेच्या वतीने “भारतीय संविधानाची” माहीत देउन उद्येशिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थीत म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देवराव हातोले, उपाध्यक्ष प्रभाकर अंभोरे, प्रमुख्याने उपस्थित गावचे प्रतिष्ठित नागरिक सरपंचपती खुशालजी तायडे, उपसरपंच श्रीकृष्णजी हातोले,ग्रामसेवक स्नेहलजी गवई,श्रीकृष्ण तायडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश रोकडे,विलास हातोले,गजानन कचाले, धर्मेंद्र हातोले,अनिकेत हातोले,राहुल अवसरमोल, आदित्य हातोले, जितकुमार इंगळे, इत्यादी लोक उपस्थित होते.


